तळागाळातील लोकांच्या हिताची तळमळ, पारदर्शी जीवन, कमालीची निर्भीडता, शासनव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत, लढण्याची उर्मी, ही एनडीसरांची गुण वैशिष्ट्ये होती...
जिथं एनडींचा जन्म झाला, तो परिसर क्रांतिकारकांचं आगर होता. क्रांतीसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्यांच्या संघर्षाने भारलेलं वातावरण, कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षणक्षेत्रामधील योगदान, धडपड, तळमळ आणि त्यातून उभारलेल्या शिक्षण संस्थांचा आधारवड, यामुळे परिवर्तनवादी विचारसरणीचा, जीवनशैलीचा वस्तुपाठच एनडींना मिळालेला होता.......